I found this as one of the forwards in mail, couldn’t resist putting it on my website.
माणूस जेवढा शौचालयात बसतो तेवढ्या वेळेच्या १०% वेळात तो आपला ९०% पोट रिकामा करतो आणी बाकीच्या १०% वेळात तो उरलेला १०% पोट रिकामा करतो.
फेक मंडळ समितीने केलेल्या चाचणीत त्यांनी ५० विविध क्षेत्रातील लोकांवर हा अभ्यास केला. आणी आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जी लोक अतीशय व्यस्त असतात तीच लोक जास्त शौच्यास बसतात. जेव्हा लोकांना जुलाब होतो तेव्हाच कमी बसतात.
संडास झाल्यानंतरही १०% लोकं अश्या अपेक्षेने बसतात की पोटातील प्रक्रीया आपण बसल्या मुळे अजून तीव्र गतीने काम करुन पुन्हा काहीतरी निघेल. ५% लोकं शी झाल्यानंतर जेव्हा उभे रहातात, तेव्हा पुन्हा कळ येते.
५०% लोकांना कळ ही सिगरेट, तंबाकू किंवा चहा घेतल्यावर येते, ह्या कळेला ते “pressure” असे म्हणतात. ३०% लोकं खाली किती पडली ते बघून समाधान मानतात तर ७०% लोकं वारंवार पाणी टाकत रहातात. भारतात जवळजवळ ४०% लोकसंख्या बाहेर शी करते. ही लोकं तांब्या किंवा handle असलेले चंबू नेणे पसंत करतात. बाहेर बसल्यावर ते २ ते ३ वेळ्या स्वतःची जागा बदलतात. जी लोकं विटेवर बसतात ती सहसा जागा बदलत नाही. ५% लोकं पाणी नसल्यावर दगड किंवा कागदाचा वापर करतात, सहसा अशी वेळ येत नाही, आणी ह्यातून ८०% लोकं पुन्हा घरी जाऊन धुऊन घेतात.
60% लोकांना आहू-बाजूला कोणी असल्याचा आवाज आलातर शी होत नाही, असली लोकं फारच “conscious” असतात. असल्यावेळी ते नळाचा आवाज मोठा करून आतमधून निघणारा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात. माणूस ९०% वेळ (जेव्हा १०% शी निघते) घालवतो ह्याचाही अभ्यास केला गेला आहे. जेव्हा माणूस आत शिरतो तेव्हा त्याला घाण वास येतो मात्र स्वतः शी केल्यावर त्याला मुळीच घाण वास येत नाही. २०% लोकं बकेटतल्या पाण्याशी खेळत बसतात, त्यात मुंगी किंवा किडा टाकून बघतात. २०% लोकं समोरच्या भिंतीत आकार शोधण्याचा प्रयत्न करतात, ५०% लोकं नुस्ता विचार करतात, विशेष म्हणजे शौचालयात केलेला विचार बाहेर येऊन पूर्णपणे विसरून जातात. १0% लोकं दिवसभर काय करायच हाच विचार करतात.
जोरात आलेली शी काढताना जो आनंद येतो तो आनंद कश्यातच नाही असे ३०% लोकं म्हणतात, ३५% लोकांना बाहेरबसून करण्यातच अत्याधीक आनंद येतो. ३५% लोकांनी उत्तर देण्यास नकार दिला.
अनेक लोकांना असा गैरसमज आहे की नाभीला थुका लावल्यानी लागलेली शी जाते, परंतू शी येण्या मागे सुद्धा मानसीक विचार शक्तिचा प्रभाव आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तिला जोरानी शी लागली असेल व तो घरा कडे निघाला असेल तर त्याची तीव्रता अधीक वाढते, जसा जसा घरी पोचतो तशी तीव्रता वाढते … आणी शौचालयात घुसताच ती शिघेला पोचते, तो निकर खाली काढे पर्यंत शी सुद्धा जोरात बाहे निघते. ह्याचे कारण म्हणजे जसा जसा तो बाहेरून घरी पोहचतो तसा तसा त्याला एवढा विश्वास होतो की आपण शी करणार आहोत, म्हणून शीची तीव्रता जोरात वाढत जाते, जर घरी पोचल्यावर शौचालयात कोणी आगोदर बसून असेल तर तीव्रता आपोआप कमी होते. शीची तीव्रता हा एक मानसीक खेळ आहे.